काँग्रेसने धर्माचे तर राष्ट्रवादीने जातीचे राजकारण केले – पंकजा मुंडे

काँग्रेसने सत्ताकाळात मुस्लिमांना घाबरवून धर्माचे राजकारण केले. तर राष्ट्रवादीने जातीच्या नावाने राजकारण केले. असा घणाघात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी नांदेड येथील मुखेडच्या सभेत केला. मुखेड विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार डॉ. तुषार राठोड यांच्या प्रचारासाठी त्या आल्या होत्या. भारताच्या कानाकोपऱ्यात तिरंगा फडकला पाहिजे. मोदी सरकारने जम्मू काश्मिरातील कलम 370 रद्द केले. याचा विरोधक प्रचाराचा मुद्दा करत असल्याचा आरोप पक्षावर होतोय. मात्र तो प्रचाराचा मुद्दा नसून संस्काराचा मुद्दा आहे, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी विरोधकावर हल्लाबोल केला.

पंकजा मुंडे पुढे बोलताना म्हणाल्या की, काँग्रेस राष्ट्रवादीने जातीचं राजकारण केलं. काँग्रेसवाले म्हणाले की, भारतीय जनता पार्टीपासून दूर राहा. ही पार्टी अल्पसंख्यांकांच्या विरोधात आहे. काय झालं पाच वर्षात अल्पसंख्यांकांच्या केसाला तरी धक्का लागला का. या चोरांनी तुमच्या मनात असा भ्रम निर्माण केला. आणि आज राष्ट्रवादीने जातीचा प्रचाक सुरू केला. जात पाहून मतं देत बसलो तर या देशाचं कधीच भलं होणार नाही. राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांना जातीच्या नावाने डिवचलं त्याच मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वाखाली मराठ्यांना आरक्षण मिळालं.

Loading...

 

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.