धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध

राष्ट्रवादीचे नेते आणि परळी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे यांचा घनसावंगीत फोटोला जोडे मारून निषेध करण्यात आलाय. पंकजा मुंडे यांच्या विषयी धनंजय मुंडे यांनी आक्षेपार्ह विधान केलेली व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यामुळे परळी विधानसभा मतदारसंघातील बहीण भावाचं राजकारण चांगलचं तापलं.

त्याचाच निषेध करण्यासाठी आज पंकजा समर्थकांनी धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध व्यक्त केला. त्याचबरोबर धनंजय मुंडे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान या प्रकरणी धनंजय मुंडेंवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत पंकजा समर्थकांकडून पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आलं आहे.

धनंजय मुंडेंनी भाषणादरम्यान भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंविषयी आक्षेपार्ह विधान केल्याची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यानंतर धनंजय मुंडेंवर चहुबाजूंनी टीका करण्यात आली. दरम्यान धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी भाजपने महिला आयोग आणि निवडणूक आयोगाकडेही तक्रार करण्यात आली होती. धनंजय मुंडेंच्या या वक्तव्यानंतर पंकजा मुंडेच्या कार्यकर्त्यांमध्ये संताप पाहायला मिळाला. मात्र धनंजय मुंडेंनी पत्रकारपरिषद घेत हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.