‘पंकजा मुंडे या भाजपाच्या नेत्या होत्या, आजही आहेत अन् उद्याही असतील’

- Advertisement -
विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर भाजपा नेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. माजी मंत्री पंकजा मुंडे शिवसेनेच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांना पत्रकार परिषदेत याबद्दलचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राज्यातले अनेक प्रमुख नेते शिवसेनेच्या वाट्यावर आहेत. पंकजा मुंडे काय करतात, ते 12 डिसेंबरला कळलेच, असं सूचक विधान राऊत यांनी केलं होतं. मात्र, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी स्पष्टीकरण दिलंय.
पंकजा मुंडे या भाजपाच्या नेत्या होत्या, आजही आहेत अन् उद्याही असतील, असे म्हणत पंकजा मुंडेंच्या शिवसेना प्रवेशाचे वृत्त चंद्रकांत पाटील यांनी फेटाळून लावले. भाजपाच्या आजच्या स्थितीमध्ये गोपीनाथ मुंडेंचं मोठं योगदान आहे. पंकजा मुंडे या गोपीनाथ मुडेंनी उभारलेल्या भाजपाच्या कार्यकर्त्या, नेत्या आहेत. त्यामुळे, भाजपा सोडून इतर कुठल्याही पक्षासोबत त्या जाणार नसल्याचं पाटील यांनी म्हटलंय.
Loading...
Related Posts
विशेष म्हणजे आमचं त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे, त्यामुळे मीडियातील या बातम्या केवळ अफवा असल्याचंही पाटील यांनी स्पष्ट केलंय. 12 डिसेंबर रोजी गोपीनाथ मुंडेंची जयंती असते, त्यामुळे 12 डिसेंबरला काही वेगळी घोषणा होईल, असे नाही. जयंती दिनाच्या कार्यक्रमाची ही माहिती असल्याचंही पाटील यांनी सांगितलं.
- Advertisement -
Loading...
महाराष्ट्रातले अनेक प्रमुख नेते शिवसेनेच्या वाटेवर – संजय राऊत @inshortsmarathi https://t.co/vbs1lRuS5T
— InShorts | मराठी (@InshortsMarathi) December 2, 2019
भाजपचे 'हे' दाेन आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर….@inshortsmarathi https://t.co/H4lALZSfG2
— InShorts | मराठी (@InshortsMarathi) December 2, 2019