ओबीसी आरक्षणावरून पंकजा मुंडेंचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप, म्हणाल्या…

मुंबई : मराठा आरक्षणावरून वातारण पेटलेलं असताना ओबीसी आरक्षणावरून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी सरकारवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे.

“राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत इतर मागासवर्गास न मिळणारे आरक्षण अन्याय करणारे असून या विषयावर शांत राहणार नाही. राज्य सरकारला ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे असं वाटतच नाही, त्यामुळे राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात नीट बाजू मांडली नाही,” असा आरोप पंकजा मुंडे यांनी केला आहे.

“मराठा आणि ओबीसी आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडताना सरकार कमी पडलंच आहे. आता आरक्षण विषयात दिशाभूल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जनगणनेकडे आरक्षणाचा विषय वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, “अशी भूमिका त्यांनी याआधी मांडली होती.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा