‘पंकजा मुंडे यांच्या निष्ठेवर भाजपाचा संपूर्ण विश्वास’

भाजपा-शिवसेना युती सरकारच्या काळात महिला-बाल कल्याण आणि ग्रामविकास खात्याचा पदभार सांभाळणाऱ्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या फेसबूकद्वारे कार्यकर्त्यांना उद्देशून एक पोस्ट लिहिली, ज्यात सध्याची राजकीय परिस्थिती पाहता नवीन विचार करण्याची आवश्यकता असल्याचं पंकजा मुंडेंनी म्हटलं होतं. यानंतर पंकजा मुंडेंनी ट्विटर अकाऊंटवरुन आपली भाजपासंदर्भातली ओळखही काढून टाकली. त्यामुळे पंकजा मुंडे या शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. भाजपा नेते विनोद तावडे यांनी देखील माध्यमांशी बोलताना, यासंदर्भात उगाच चुकीचा अर्थ काढायचं काही कारण नसल्याचे सांगितले आहे.

यावेळी माध्यमांशी बोलताना तावडे म्हणाले की, पंकजा मुंडे यांच्याशी माझं स्वतःचं बोलणं झालं आहे. १२ डिसेंबर रोजी असणाऱ्या कार्यक्रमाचं निमंत्रण त्यांनी त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना, अनुयायांना दिलेलं आहे. पंकजा मुंडे यांची ठाकरे कुटुंबीयांशी जवळीक आहे. महाजन, मुंडे कुटुंबीय व्यक्तिगत नेहमीच ठाकरे कुटुंबीयांच्या जवळ राहिलेले आहेत. पण याचा अर्थ म्हणजे काय पंकजा मुंडे भाजपा सोडून शिवसेनेत जातील, असा कधीच होऊ शकत नाही. तसेच, पंकजा मुंडे यांच्या निष्ठेवर भाजपाचा संपूर्ण विश्वास आहे. त्यांनी फेसबुकपोस्टद्वारे केवळ त्यांच्या सहकाऱ्यांना आणि अनुयायांना निमंत्रण दिलेलं आहे. उगाच चुकीचा अर्थ काढायचं काही कारण नाही.

Loading...

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.