Paragliding In India | पॅराग्लायडिंगचा आनंद घ्यायचा असेल, तर ‘या’ सुंदर ठिकाणांना द्या भेट

Paragliding In India | टीम महाराष्ट्र देशा: वसंत ऋतु हा पर्यटनासाठी योग्य मानला जातो. कारण या ऋतूमध्ये वातावरण जास्त थंडही नसते आणि उष्णही नसते. त्यामुळे या वातावरणात लोक फिरायला (Travel) जाण्याची प्लॅनिंग करत असतात. फिरायला जाण्यासोबतच लोक या ऋतूमध्ये अनेक ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी प्लॅन करतात. यामध्ये प्रामुख्याने लोकांना पॅराग्लायडिंग करायला आवडते. तुम्ही पण यावर्षी या ऋतूमध्ये पॅराग्लायडिंग करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला देशातील सर्वोत्कृष्ट पॅराग्लाइडिंगच्या ठिकाणांबद्दल माहिती सांगणार आहोत. देशामध्ये पुढील ठिकाणी सर्वोत्तम पॅराग्लायडिंगचा अनुभव घेता येतो.

बीर-बिलिंग

हिमाचल प्रदेशमध्ये स्थित असलेले बीर-बिलिंग हे ठिकाण पॅराग्लायडिंगसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. या ठिकाणी पॅराग्लायडिंग ओलंपिकचे आयोजन करण्यात येते. या ठिकाणी तुम्हाला सर्वोत्तम पॅराग्लायडिंगचा अनुभव घेता येऊ शकतो. त्यामुळे तुम्ही या ऋतूमध्ये पॅराग्लाइडिंग करण्याचा विचार करत असाल, तर बीर-बिलिंग तुमच्यासाठी सर्वोत्तम ठिकाण ठरू शकते.

कामशेत

तुम्ही जर मुंबई-पुण्याच्या आसपास पॅराग्लाइडिंग शोधत असाल, तर कामशेत तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. कामशेत पॅराग्लाइडिंगबद्दल फारशा लोकांना माहिती नाही. त्यामुळे या ठिकाणी जास्त गर्दीही नसते. त्यामुळे कामशेतमध्ये तुम्ही निवांत पॅराग्लायडिंगचा आनंद घेऊ शकतात. पॅराग्लायडिंगसोबतच कामशेतमध्ये फिरण्यासाठी अनेक निसर्गरम्य ठिकाणं आहेत.

श्रीनगर

पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून प्रसिद्ध असलेल्या काश्मीरच्या श्रीनगरमध्ये तुम्ही पॅराग्लाइडिंगचा अनुभव घेऊ शकतात. श्रीनगरमध्ये मोठ्या संख्येने लोक पॅराग्लायडिंगचा आनंद घेण्यासाठी येतात. श्रीनगर येथील दाल सरोवरावर पॅराग्लायडिंगचा आनंद लुटण्याची मजा वेगळीच आहे. त्यामुळे तुम्ही जर पॅराग्लायडिंगचा विचार करत असाल, तर तुम्ही श्रीनगरला नक्कीच भेट दिली पाहिजे.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.