Param Bir Singh | मविआला मोठा झटका! मुंबई माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचे निलंबन मागे

Param Bir Singh | मुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लेटर बॉम्ब टाकणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावरील सर्व आरोप शिंदे सरकारकडून मागे घेण्यात आले आहेत. शिंदे सरकारने परमबीर सिंग यांना सर्व आरोपांमधून मुक्त केलं  आहे.

परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बमुळे राज्यात खळबळ उडाली होती. त्यामुळे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये वसुलीचा आरोप केला होता. त्यानंतर महाविकास आघाडी अडचणीत सापडली होती. त्यानंतर पोलीस आयुक्तांना निलंबित करण्यात आलं होतं. आज राज्य सरकारने त्यांचं  निलंबन मागं  घेतलं आहे.

परमबीर सिंग यांना खंडणी, भ्रष्टाचार आणि गैरवर्तुणुकीच्या अनेक खटल्यांचा सामना करावा लागला होता. कारमायकल रोडवर बॉम्ब प्रकरणाच्या चुकीच्या हाताळणीमुळे त्यांना मुंबई पोलीस प्रमुख पदावरून हटवण्यात आलं होतं.

डिसेंबर 2021 मध्ये परमबिर सिंग यांचा निलंबन आदेश जारी केला होता. राज्य सरकारने आज त्यांचे निलंबन मागे घेतलेले असून सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनी सडकून टीका करायला सुरुवात केली आहे.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.