मोठी बातमी! परमबीर सिंह यांचं आज निलंबन? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून फाईलवर स्वाक्षरी

मुंबई : १०० कोटी वसुली घोटाळा प्रकरण गेले अनेक दिवसांपासून राज्यात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. या प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख, मुंबई माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह आणि सचिन वाझे हि प्रमुख नावे आहेत. यानंतर आज परमबीर सिंह यांच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे. बेशिस्त वर्तवणूक आणि अनियमितता यासाठी ही कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फाईलवर स्वाक्षरी केली असून यासंबंधी आजच आदेश दिला जाण्याची शक्यता आहे. परमबीर सिंह यांच्या निलंबनाचा प्रस्ताव आता केंद्र सरकारकडे पाठवला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. आयएएस अधिकारी देबाशीष चक्रवर्ती यांच्या नेतृत्वाखालील समितीने तपासानंतर काही सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार ही निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, याआधी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नियमांचं उल्लंघन करणाऱ्या परमबीर सिंह यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाई असं सांगितलं होतं. “बेशिस्त वर्तन आणि अनियमितता यासाठी परमबीर सिंह यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याच्या प्रक्रियेत आम्ही आहोत. त्यांच्यावरील निलंबनाची कारवाईची प्रक्रियादेखील सुरु आहे,” असं त्यांनी सांगितलं होतं.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या