“पंतप्रधानांनी शपथ घेतल्यानंतर संसद आपली आत्महत्या करते, संसदेला काहीही अधिकार राहत नाहीत”

सातारा : कराडमध्ये अ‍ॅड. आनंदराव ऊर्फ दाजीसाहेब चव्हाण यांच्या स्मृतिप्रित्यर्थ विधी सल्ला शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. तसेच, यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.

“पार्लमेंटची निवडणूक लागली की छोटा पक्ष आपला नेता निवडून देता. तो पंतप्रधान होतो. त्या व्यक्तीने पंतप्रधान पदाची शपथ घेतली कि संसद आपली आत्महत्या करते. संसदेला काहीही अधिकार राहत नाहीत. आपल्या देशामध्ये जो अमेरिका इंगलंडमध्ये नाही तो पक्षांतर बदली करण्याचा वापर आता होऊ लागला आहे. आपल्या देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेत अस्तित्वात असलेली कल्पना अंमलात आणली गेलेली नाही,” असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.

“सर्व संसद सदस्यांना आणि विधानसभेच्या आमदारांना थेट मुख्यमंत्र्यांचे अथवा सत्ताधारी पक्षांचे गुलाम अशाप्रकारे वागण्याची सुरुवात झाली आहे. हे मी विधान विचारपूर्वक करतोय. कारण दीड वर्ष मी पार्लमेंटमध्ये घालवली आणि इथे 10 वर्ष झाली. त्यामुळे पक्षांतर्गत कायदे बंदी करण्याचा पुनर्विचार करायला पाहिजे. फक्त त्याठिकाणी विश्वासदर्शक ठराव घेणे आवश्यक आहे. बाकी विधेयक मांडणं त्यावर मत प्रदर्शन करणे, विरोध करणे हे अधिकार दिलेले नाहीत,” असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा