कागलनंतर सोमय्यांच्या रडारवर पारनेर साखर कारखाना!

मुंबई : भाजपचे फायर ब्रँड नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्ट्राचाराचे आरोप लावले होते. अशातच आज किरीट सोमय्या कोल्हापूरातील सेनापती संताजीराव घोरपडे कारखान्याची पाहणी करण्यासाठी जाणार होते. पाहणीनंतर ते पत्रकार परिषद घेऊन ग्रामविकासमंत्री यांच्यावर घोटाळ्याचा नवीन आरोप करणार होते.

अशातच आता किरीट सोमय्या पारनेर सहकारी साखर कारखान्याचा घोटाळा उघड करण्यासाठी पारनेरमध्ये येत आहेत. परिणामी नगर प्रशासन सतर्क झालं आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही अंमबजावणी संचालनालय पारनेर तालुक्यातील साखर कारखान्याच्या चौकशीसाठी येत नसल्याचा आरोप करून यासाठी पाठपुरावा करणाऱ्या कार्यकर्त्यांनी ईडीच्या कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

यासंबंधी त्यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचीही भेट घेतली. सोमय्या यांनी लवकरात लवकर यामध्ये लक्ष घालण्याचे आणि पारनेरला येण्याचे आश्वासन त्यांना दिले आहे. सोमय्या यांनी आपण पारनेर सहकारी साखर कारखान्याच्या चौकशीसाठी येत असल्याचं जाहीर केलं होतं. पारनेर सहकारी साखर कारखाना हा पारनेर तालुक्यातील कारखाना आहे. पारनेर भागात या कारखान्याचे सभासद संख्या मोठ्या प्रमाणात असल्यानं सोमय्या काय खुलासा करणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या