InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर, पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवारी

राष्ट्रवादी काँग्रेसने आज उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली असून, दुसऱ्या यादीमध्ये अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा मतदार संघातून माघार घेत, पार्थ पवार यांची मावळ मधील उमेदवारी निश्चित केली होती. त्यामुळे मावळ मतदार संघाकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

पार्थ पवार यांच्याबरोबरच शिरूरमधून शिवसेना सोडून राष्ट्रवादीमध्ये आलेल्या अमोल कोल्हे यांना देखील उमेदवारी देण्यात आली आहे.  नाशिकमधून समीर भूजबळ यांचे पूत्र समीर भूजबळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच, दिंडोरीमधून, धनराज महाले, बीडमधून बजरंग सोनावणे यांना उमेदवारी देण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply