InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

पार्थ पवारांच्या ड्रायव्हरचे अपहरण; बेशुद्धावस्थेत सापडला

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या गाडीचा चालक मनोज ज्योतीराम सातपुते याचे मुंबईतून अपहरण करून त्याला (सुपा ता. पारनेर, जि. नगर ) येथे बेशुद्धावस्थेत सोडून देण्यात आले. अपहरणकर्त्यांनी तु पार्थ पवारांचा ड्रायव्हर का ? असे म्हणून अपहरण केल्याने कुलाबा (मुंबई) व शिक्रापूर (जि.पुणे) पोलीसही चक्रावले असून या प्रकरणी स्वतः पार्थ पवार या घटनेच्या खोलात जावून माहिती घेण्यासाठी मुंबई व पुणे जिल्हा पोलिसांच्या सतत संपर्कात आहेत.

याबाबत चालक मनोज ज्योतीराम सातपुते ( वय २६, रा. सणसवाडी, ता. शिरूर, जि. पुणे ) याने फिर्यादीत दिलेल्या माहिती नुसार दि.५ रोजी रात्री ८ वाजता मुंबईत कुलाबा बेस्ट डेपो जवळ उभा असताना एक लाल रंगाची ओमनी गाडी सातपूते याचेजवळ आली व तु पार्थ पवारांच्या गाडीचा चालक आहेस का? आम्हाला त्यांना भेटायचे आहे, असे म्हणून त्याला गाडीच्या पुढच्या सीटवर बसविले.मात्र, त्यापुढील काहीच आठवत नाही असे सांगून सातपूते यांना थेट सुपे येथे सोडल्याचे आठवत असल्याचे त्यांनी पोलिसांना लिहून दिले आहे. 

महत्वाच्या बातम्या-

जातीबाहेर लग्‍न केल्‍याने वडिलांकडून माझ्या जीवाला धोका

अबब ! सरकारनं तुमचा डेटा विकून कमावले कोट्यवधी रुपये

वाळू माफियांचा अधिकाऱ्यावर हल्ला

युवासेनेच्या कार्यकर्त्यांची अभाविपच्या कार्यकर्त्यांना मारहाण

एका मराठ्यानं एक लाख मतांचं नियोजन करा – पंकजा मुंडे

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply