Patanjali Ayurved | रामदेव यांच्या पतंजलीकडून लोकांची फसणूक; शाकाहारी असल्याचे सांगून विकतात मांसाहारी उत्पादने

Patanjali Ayurved | दिल्ली : आयुर्वेदामध्ये अग्रेसर म्हणून ओळखली जाणारी पतंजली आयुर्वेद ही कंपनी सर्वांनाचं माहीत आहे. योग गुरू स्वामी रामदेव आणि त्यांचे सहकारी बाळकृष्ण यांनी २००६ मध्ये याची स्थापना केली होती. यानंतर आयुर्वेद या कंपनीने आपला दर्जा कायम ठेवला आहे. औषध, अन्नपदार्थ, सौंदर्यप्रसाधने अशा अनेक गोष्टीचा समावेश पतंजलीने केला आहे. यामुळे दररोजच्या जीवनात अनेक लोक पतंजलीच्या वस्तूचा वापर करतात. परंतु आता याबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे  वकील शाशा जैन यांनी पतंजली आयुर्वेदला ‘ मांसाहारी’ घटक वापरून “दिव्य दंत मंजन” तयार करुन फसवणूक केल्याचा आरोप करत कायदेशीर नोटीस बजावली आहे.

तसचं ही कंपनी त्यावर हिरवे लेबल लावते, म्हणजे ते उत्पादन पूर्णपणे शाकाहारी असल्याचं सांगितलं जातं त्यातून ग्राहकांची दिशाभूल केली जात असल्याची तक्रार देखील त्यांनी या नोटिसमध्ये केली आहे. एकबाजूला कंपनी आपल्या उत्पादनांमध्ये शाकाहारी घटकांचा वापर करत असल्याचा दावा करते, तर दुसऱ्याबाजूला त्यांच्या दिव्य दंत मंजन टूथपेस्टमध्ये सी फेन (कटलफिश) येत असेल तर ही फसवणूक आहे. त्यामुळे याबाबत कायदेशीर नोटिस पाठवून कंपनीकडून स्पष्टीकरण देखील मागितलं असल्याचं शाशा जैन यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, कंपनी आपले उत्पादन शाकाहारी उत्पादन म्हणून बाजारात आणते, तेव्हा त्यात मांसाहारी वस्तू वापरणे हे ग्राहकांच्या हक्कांचे उल्लंघन आहे. तसचं उत्पादन लेबलिंग कायद्याचे उल्लंघन आहे. नातेवाईक, सहकारी आणि मित्र सर्वजण या उत्पादनाचा वापर करतात यामुळे त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात असं देखील शाशा जैन यांनी म्हटलं आहे. याचप्रमाणे नोटिसमधून शाशा जैन यांनी 15 दिवसात कंपनीने याबाबत स्पष्टीकरण द्यावं नाहीतर कायदेशीर प्रक्रिया सुरू केली जाईल असा इशारा देखील दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

Original NEWS SOURCE – https://bit.ly/41QuyqL