Pathaan Controversy | संत परमहंस आचार्य यांनी दिली शाहरुखला धमकी, म्हणाले…

Pathaan Controversy | अयोध्या : बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) यांचा आगामी चित्रपट ‘पठाण’ (Pathaan) रिलीज आधीच वादत सापडला आहे. या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ हे गाणं रिलीज झालं, तेव्हापासून वातावरण चांगलाचं तापलेलं आहे. या गाण्यांमध्ये दीपिकाने घातलेल्या भगव्या बिकिनीमुळे खळबळ निर्माण झाली आहे. या चित्रपटाच्या विरोधात अनेक हिंदू संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. आता अयोध्येतील जगद्गुरु संत परमहंस आचार्य यांनी या वादावर प्रतिक्रिया दिली आहे.

‘पठाण’ चित्रपटामध्ये दीपिकाने भगव्या रंगाची बिकिनी घालून, भगव्या रंगाचा अपमान केला आहे. त्यामुळे अनेक लोक या चित्रपटाला विरोध करत आहे. संत परमहंस आचार्य या चित्रपटावर टीका करत म्हणाले की,”हा सिनेमा म्हणजे जिहाद असून, हे एक मोठे षडयंत्र आहे. त्यामुळे आम्ही आज शाहरुख खान चे पोस्टर जाळले. जर मला शाहरुख खान दिसला तर मी त्याला जिवंत जाळून टाकेल. त्याचबरोबर हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला, तर तो पेटवून दिला जाईल. आता सध्या आम्ही फक्त शाहरुख खानचे पोस्टर जाळले आहेत. तो जरा मला सापडला तर आम्ही त्याला जिवंत झालो. आम्ही सध्या शाहरुख खानच्या शोधात आहोत. तो जर आम्हाला भेटला, तर आम्ही त्याची चांगलीच सोय बघू. त्याला भगव्याची इतकी चीड आहे, तर आम्ही त्याला भगव काय आहे, ते दाखवून देऊ. माझ्या आधी तो दुसऱ्या कोणाला सापडला आणि त्याने त्याला जाळलं तर त्या व्यक्तीचा खटला मी लढेल. जो कोणी आमच्या सनातनाचा अपमान करेल, त्याला आम्ही सोडणार नाही.”

पुढे बोलताना संत परमहंस आचार्य म्हणाले की,”शाहरुख खान आमिर खान आणि सलमान खान ही तिन्ही नावे माझ्याकडे आहे. तिघांनाही मी मृत्युदंड निश्चित केला आहे.” ‘पठाण’ चित्रपटावर बहिष्कार टाकावा, असे देखील आचार्य त्यावेळी म्हणाले आहे.

‘बेशरम’ रंग या गाण्यातून अश्लील त्याचे प्रदर्शन केलं जात असल्याचे अनेक नेटकऱ्यांच म्हणणं आहे. त्यामुळे आता दीपिका आणि शाहरुखच्या या चित्रपटाला बहिष्कारला सामोरे जावे लागतआहे. दीपिका आणि शाहरुखचा ‘पठाण’ चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.