रेणू शर्मा प्रकरणाबाबत पाटलांची प्रतिक्रिया म्हणाले, गेंड्याच्या कातडीचे हे मंत्री आणि महाविकास आघाडीचे सरकार

राज्याच्या राजकारणात सद्या एक चर्चेचा विषय समोर आलाय. राजकीय वर्तुळात याबाबत चर्चेला उधाण आलय. राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केल्याची बातमी समोर आली. २००६ सालापासून धनंजय मुंडे तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होते अशी तक्रार ओशिवरा पोलिस ठाण्य़ात रेणू शर्मा या महिलेने केली होती.

यानंतर भाजप आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. “सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या चुकीच्या कृत्याबद्दल ताबडतोब राजीनामा द्यावा.

मुंडे यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप पाहता मंत्री पदी राहण्याचा त्यांना हक्क नाही. मात्र, गेंड्याच्या कातडीचे हे मंत्री आणि महाविकास आघाडीचे सरकार याबाबत आत्मपरीक्षण करुन राजीनामा घेतील असं वाटत नाही”, अशी पोस्ट चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.