‘कंगुबाईच्या वक्तव्यामुळे देशभक्तांचा अपमान, तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा’

मुंबई : बॉलिवूडची क्वीन कंगना रणौत पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानं आनंद व्यक्त केला होता. कंगनाने इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला. तिने तिच्या चाहत्यांचे खूप आभारदेखील मानले. मात्र, आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले ते भीक होती, देशाला खरे स्वातंत्र्य २०१४ मध्येच मिळाले, असे कंगनाने एका मुलाखतीदरम्यान सांगितले. यानंतर कंगनावर टीकेची झोड उठत आहे.

यातच आता कंगना रणौतचा पद्मश्री पुरस्कार परत घेण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. तसेच शिवसेनेनेही यावर आक्रमक भूमिका घेत कंगनाचे सर्व पुरस्कार कडून घेण्याची मागणी केली आहे. कंगनाची विरोधात आता महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. यानंतर आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिलीय.

कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. तसेच ‘कंगना रानौतच्या म्हण्यानुसार देशाला १९४७ मध्ये जे स्वातंत्र्य मिळाले ती भीक होती, खरे स्वातंत्र्य २०१४ ला मिळाले. ह्या कंगुबाईने केलेलं हे वक्तव्य देशासाठी बलिदान देणाऱ्या तमाम देशभक्तांचा अपमान असून या बाईवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी मिटकरी यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा