पवनदीप राजन ठरला ‘इंडियन आयडॉल 12’ सिझनचा विजयी!

मुंबई : लोकप्रिय शो ‘इंडियन आयडाॅल 12’ ची सर्वत्र तुफान चर्चा रंगलेली आहे. यावर्षीचा विजेता कोण होईल याकडे सगळ्यांच्या नजरा खिळल्या असतानाच काल रात्री 12 नंतर या विजेत्याची घोषणा करण्यात आली.

स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पवनदिपला ही खास भेट मिळाली आहे. पवनदिप विजेता असल्याचं घोषित होताच सगळीकडे आनंदाची लहर निर्माण झाली. पवनदीपच्या चाहत्यांचा तर खुशीचा ठिकाणाच राहिला नाही. सध्या सोशल मीडियावर याचीच चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे.

इंडियन आयडल 12′ ची चकाकती ट्राफी आणि 25 लाखांची रक्कम देऊन पवनदीपला गौरविण्यात आलं.
इंडियन आयडॉल 12 च्या सहा फायनलिस्ट्समध्ये चांगलीच चुरस रंगली होती. मात्र सर्व स्पर्धकांना मागे टाकत इंडियन आयडॉलच्या 12 व्या सिझनच्या ट्रॉफीवर पवनदीप राजननं आपलं नाव कोरलं.

दरम्यान, विजेत्या ठरलेल्या पवनदीपला एका म्युझिक कंपनीसोबत गाणं गाण्याची संधी देखील देण्यात येणार आहे. अरूणिता कांजीलाल ही उपविजेती ठरली. यानंतर तिसऱ्या नंबरवर सायली कांबळेनं आपलं नाव नोंदवलं आहे. इंडियन आयडाॅल शोमध्ये द ग्रेट खलीही उपस्थित होता. शोचे जज अनु मलिक, सोनू कक्करही उपस्थित होते. सध्या सर्वत्र जल्लोष पाहायला मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा