InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

महाराष्ट्रातील गंभीर पूर परिस्थिबाबत पवार आणि मोदी  यांच्यात फोनवर चर्चा 

- Advertisement -

महाराष्ट्रातील गंभीर पूर परिस्थिबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्यात फोनवर चर्चा  झाली .शरद पवार यांनी महापुरामुळे निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली . त्यावर पंतप्रधानांनी महाराष्ट्र व कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांशी बोलून या भीषण पूर परिस्थिबाबत मार्ग काढणार असल्याचे सांगितले

राज्यातील पूर परिस्थितीबाबत शरद पवार यांनी पंतप्रधानांशी बोलावे अशी विनंती पूरग्रस्त सांगलीतील नागरिकांनी केली होती. त्यानुसार आज पवार यांनी मोदी यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा करुन राज्यातील पूर परिस्थितीच्या भीषणतेची माहिती त्यांना दिली.

Loading...

- Advertisement -

आलमटी धरणातून पाच लाख क्यूसेक्सने पाणी सोडणे गरजेचे असताना ते पुरेशा प्रमाणात सोडले जात नाही. पाण्याच्या फुगवट्यामुळे सांगलीला पुराचा तडाखा अधिक तीव्रतेने बसला आहे, या संदर्भात नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी बोलून मार्ग काढावा अशी विनंती पवार यांनी मोदी यांना केली आहे. राज्यातील पूरग्रस्तांना केंद्राकडूनही सर्वतोपरी मदतीबाबतही पंतप्रधान सकारात्मक आहेत.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही मी याबाबत बोललो असल्याचे पवार यांनी  सांगितले.

Loading...

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.