“पवार म्हणजे फक्त तडफड, पवारांना कुठेच जम बसवता आला नाही”

मुंबई : सध्या शरद पवार चार दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. याच दरम्यान तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून मोदींना पर्याय देण्यासंदर्भात सुरू असलेल्या हालचालींबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना पवार म्हणाले, मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारच्या विरोधातील लढय़ाचे नेतृत्व कोणी करावे हा मुद्दा नाही. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नेतृत्व करावे की आणखी कोणी हा विषयच नाही. पण, एक पर्याय देणे आवश्यक आहे.

पुढे लोकांची तशी इच्छा आहे आणि पर्याय उभा करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सहकार्य राहणार आहे. मोदींविरुद्ध पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचं पुर्णपणे सहकार्य असणार आहे, असं देखील शरद पवार म्हणाले होते. यावरून निलेश राणे यांनी ट्विट करून शरद पवारांच्या वक्तव्यावर ताशेरे ओढले आहेत. शिवाय त्यांनी ट्विटमध्ये पवारांची तुलना नरेंद्र मोदींसोबत केली आहे.

निलेश राणे म्हणतात, “पवार म्हणजे फक्त तडफड, पवार साहेब केंद्रात किमान 25 वर्षे आहेत आणि मोदी साहेब 7 वर्षे तरी पवारांना कुठेच जम बसवता आला नाही, अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे. तसेच आंध्र प्रदेशचे सीएम 49 वर्षाचें, 25 पैकी 22 खासदार त्यांचे पण कधी ते नको ते उपद्व्याप करत नाहीत असं म्हणत त्यांनी पवारांना उद्देशून पवार साहेबांना आजही राजकारणात दुसऱ्याची मदत घ्यावी लागते, असा घणाघात निलेश राणेंनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा