“चाणक्य समजणाऱ्यांना मात देणारे चाणक्य म्हणजे पवारसाहेब”

मुंबई : तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी मुंबईत आल्या होत्या. ममता बॅनर्जी यांनी माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली होती. मात्र या भेटीमुळे महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. अनेक तर्क वितर्क यावरून लावले जाऊ लागले आहेत.
यावरूनच आता महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगल्याचं दिसत आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते नवाब मलिक यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. आम्ही ममतादीदी सोबत राहणार की कॉंग्रेससोबत राहणार याची चिंता काहींना वाटतेय. परंतु जे स्वतःला चाणक्य समजत होते त्यांना मात देणारे पवारसाहेब चाणक्य आहेत हे लक्षात घ्यावे, अशा शब्दात नवाब मलिक यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले आहे.
या राज्यात शिवसेना आणि काँग्रेस हे दोन पक्ष एकत्र येतील असे कधी कुणी स्वप्नातही पाहिले नव्हते. तशीच परिस्थिती या देशात होणार आहे असेही मलिक यांनी सांगितले. तसेच असे बरेच लोक आहेत, जे कधी सोबत येणार याची कधी चर्चा होत नाही. परंतु या सगळ्याची मोट बांधण्याचं काम हे शरद पवार करतील, असंही मलिक म्हणाले आहेत. कोणालाही बाहेर काढून ही आघाडी होणार नाही. यात सगळ्यांचा समावेश करायचा आहे. त्यादृष्टीने आपण काम करायचं आहे, असंही मलिक यावेळी म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- काँग्रेस नाहीतर आम्ही मुख्य विरोधी पक्ष आहोत, असं दाखवण्याचा तृणमूलचा प्रयत्न : देवेंद्र फडणवीस
- भाजपाविरोधातील लढाई अंहकाराने नाही तर एकजुटीने लढली पाहिजे : नाना पटोले
- महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर येण्याचे टाळा, प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन
- काँग्रेसला बाजू ठेवून पवारांच्या साथीने ममतादीदी सत्तेची मोट बांधतायत; फडणवीसांचा निशाणा
- मोठी बातमी! परमबीर सिंह यांचं आज निलंबन? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून फाईलवर स्वाक्षरी