InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

शरद पवार यांचा सत्तासंघर्षामुळे कोकण दौरा रद्द, मुंबईकडे रवाना

- Advertisement -

राज्यात सत्तास्थापनेचा पेच अद्यापही कायम असून शिवसेना आपल्या अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर ठाम आहे. तर भाजप शिवसेनेला सत्तावाटपात झुकतं माप द्यायला तयारी नाही. त्यामुळे अनेक दिवसांपासून महाराष्ट्र राज्य राष्ट्रपती राजवटीकडे ढकललं जात आहे. राज्यात हा नवा पेच निर्माण झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुन्हा ऍक्शन मोडवर आले आहेत.

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. तर दुसरीकडे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू नये, अशी भूमिका शरद पवार यांच्यासह काँग्रेस आणि शिवसेनेनं घेतली आहे. अशा परिस्थितीत शरद पवार यांचा आज कऱ्हाड येथे नियोजित दौरा होता. कऱ्हाडचे कार्यक्रम आटोपून पवार हे कोकणाच्या दौऱ्यावर जाणार होते. मात्र राज्यातील सत्तासंघर्षात नवा पेच निर्माण झाल्याने त्यांनी कोकणाचा दौरा रद्द केला आणि लगेच मुंबईकडे रवाना झाले आहेत.

Loading...

- Advertisement -

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.