InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

पवारसाहेब आणि सुप्रियाताईंचा सावली सारखा आधार मिळतो

अहमदनगर दक्षिण मधल्या पाथर्डी-शेवगाव सारख्या तालुक्यांच्या नशिबी नेहमी दुष्काळच लिहलेला आहे. जिथं उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचे हाल तिथं हिरवीगार स्वप्न दिसणार कधी, दिसली तर साकार होणार कशी ?

गावाकडं राहून शेती करावी असलं खुळ डोक्यात घेऊन गावात चार-दोन वर्षे शेती मध्ये लक्ष घातलं. न पडणारा पाऊस, न मिळणारा भाव, सरकार दरबारा पासून होणारी शेतकऱ्यांची फरफट. हे सगळं अनुभवताना डोळ्यात पाणी तरळत असायचं. डोकं सुन्न व्हायचं. बाहेर पडले पाहिजे, शिकून स्वतःच्या पायावर उभा राहीलं पाहिजे, असं स्वप्न पडायला लागलं आणि यावर्षी शिक्षणाच्या साठी बाहेर पडलो. सगळे म्हणायचे तू चांगला लिहितोस मग ठरवलं की आपणही पत्रकारिता करू त्याचच शिक्षण घेऊ.

शिक्षण म्हणलं तर फी आली आणि त्यात शहरामध्ये शिक्षण असल्यामुळे खर्च सुद्धा भरपूर. प्रवेश मिळाला परंतु खर्च सुद्धा बरेच त्यात मेस, प्रोजेक्ट, प्रवास भाडे, असल्या बारा भानगडी. वेळोवेळी प्रचंड होत असलेला खर्च. कधी कधी वाटतायचं की गावाकडं दुष्काळ पडला आहे; आणि आपण इकडं खर्च करतोय. आपल्या शेतकरी आईवडिलांना त्रास तर देत नाही ना ?

कधी-कधी पेपर मधल्या शेतकऱ्यांच्या भयाण अवस्थेच्या बातम्या वाचून कापरे भरायचे. भीती, काळजी वाटायची गावाकडील, मन सुन्न व्हायला व्हायचं, सगळ्या गोष्टींचं सोंग आणता येत, पैशाच नाही. याच कालावधी मध्ये मला हेमंत सर यांनी आदरणीय पवारसाहेब, आणि पवार कुटूंबियांन कडून चालवल्या जाणाऱ्या पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संदर्भात माहिती दिली व सांगितले की या ट्रस्ट च्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना शैक्षणिक मदत केली जाते. बरोबरीने हे पण सांगितले की तू टेंशन नकोस घेऊ साहेबांच्या या ट्रस्ट कडून तुझ्या सारख्या तरुणांना नक्की मदत मिळेल. हजारो ग्रामीण भागातील मुलांना आणि मुलींना शिक्षण घेता यावं म्हणून तर ही ट्रस्ट काम करत आलेली आहे आणि चालवली जात आहे. पवारसाहेब आणि पवार कुटुंबा कडून आणि मी थोडा बिनधास्त झालो.

या कालावधीत अदिती ताई यांनी पण मला या संदर्भात मदत केली. याच बरोबर वेळोवेळी कागदपत्रे, माहिती या संदर्भात संपूर्ण माहिती देत होत्या, आवर्जून कॉल करून सांगत होत्या.

आज अचानक कॉल आला.

हॅलो ss कधी येतोस गणेश बारामती ला ?

मी म्हणलं विशेष ?

चेक घेऊन जावा. त्या निमित्ताने भेट पण होईल.

सध्या एका बाजूला फडतूस जाहिराती मधून कोण किती मदत केल्याची माहिती बळच बळच दाखवत आहे. लोकांना लोकांची पहायची इच्छा नसताना सुद्धा आणि दुसरीकडे आदरणीय पवारसाहेब आणि सुप्रिया सुळे ताई ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे म्हणून काम करत आहेत. कसलीही जाहिरातबाजी न करता.

गणेश शिंदे, वडगाव,  ता. पाथर्डी (अहमदनगर)

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply