InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

‘शरद पवार यांनी बहुजनांच्या डोक्यावर पुन्हा राजेशाही बसवली’

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी बहुजनांच्या डोक्यावर पुन्हा राजेशाही बसवली आहे. काँग्रेसने केवळ घराणेशाही जपली. आ. पृथ्वीराज चव्हाण हे वंचित बहुजन आघाडीवर भाजपची ‘बी टीम’ असल्याचा आरोप करतात. लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदार भाजप उमेदवारांचा प्रचार करतात. त्यामुळे कोण भाजपची ‘बी टीम’ आहे ? असा प्रश्‍न उपस्थित करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संपवणे, हेच आमचे ध्येय असल्याचे स्पष्टीकरण वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ मार्गदर्शक पार्थ पोळके यांनी दिले.

वंचित बहुजन आघाडीच्या कराडमधील मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पार्थ पोळके म्हणाले की, काँग्रेस-राष्ट्रवादीने घराणेशाही जपली आणि बहुजन समाजाचा केवळ मतांसाठी वापर केला. आज भाजपही त्याच मार्गावर जात आहे. आमच्या वाट्याचा हक्क आम्हाला मिळालाच पाहिजे. त्यासाठी आम्ही लढा उभा करू. तसेच आम्ही राजे, शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह कोणीही समोर आलो तरी घाबरत नाही, हे लक्षात ठेवा, असा इशाराही पार्थ पोळके यांनी यावेळी दिला.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply