InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

पवार साहेबांनी महायुतीत यावे- रामदास आठवले

- Advertisement -

‘शरद पवार साहेबांचा ईव्हीएम मशीनवर संशय आहे. पण आमचा पवार साहेबांवर संशय नाही. त्यांनी महायुतीत यावे,’ असं म्हणत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पवारांना टोला लगावला आहे. वसईत इथं रामदास आठवले यांचा सत्कार करण्यात आाला, तेव्हा ते बोलत होते.

- Advertisement -

राज ठाकरे यांची मनसे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित आघाडीवर रामदास आठवले यांनी टीका केली आहे. मनसे आणि वंचित हे दोघेही स्वबळावर निवडून येऊ शकत नाही, असं आठवले यांनी मह्टलं आहे.

दरम्यान, कोल्हापूरमध्येही रामदास आठवले यांनी वंचित बहुजन आघाडीवर टीका करत प्रकाश आंबेडकरांना सल्लावजा ऑफरच दिली होती. वंचितांना सत्तेपासून वंचित ठेवणारी अशी वंचित आघाडी आहे. त्यामुळे आंबेडकरांना सत्ता हवी असेल तर एनडीएमध्ये यावं, असं आठवले यांनी म्हटलं आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

Comments are closed.