पवारांनी आता ही सवय आता बदलली पाहिजे, भाजपच्या या बड्या नेत्याचं वक्तव्य

तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. केंद्र सरकारच्या ३ कृषी कायद्याविरोधात शेतकरी २ महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटला तरी दिल्लीत आंदोलन करत आहेत. आता या शेतकरी आंदोलनाला देश-विदेशातून पाठिंबा मिळत आहे.

देशात सध्या कृषी कायद्यावरुन अनेक चर्चा होताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार व्यक्त करताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

शरद पवार कृषीमंत्री असताना त्यांनी 2010 मध्ये राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. त्या पत्रांमध्ये त्यांनी एपीएमसी कायद्याचा उल्लेख केला होता. पण आता ते आपल्याच वक्त्यावरुन मागे होत आहे. ही सवय आता बदलली पाहिजे. असं म्हणत ज्योतिरादित्य शिंदेंनी पवारांना टोला लगावला आहे.

शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात कृषी क्षेत्रात खासगी क्षेत्राची भागिदारी गरजेची असून यासाठी एपीएमसी कायद्याचे संशोधन झालं पाहिजे, असं सांगत ज्योतिरादित्यांनी शरद पवारांना आठवण करून दिली.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा