दारूची चिंता करणारे ‘पवार-ठाकरे’ हे साधु-संतांच्या महाराष्ट्राला लागलेलं ग्रहणच आहे

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत गुरूवारी चंद्रपुर जिल्ह्यासाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 2015 पासून चंद्रपूर जिल्ह्यासाठी दारूबंदी लागू केली होती. परंतू या दारूबंदीमुळे चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत असल्यानं राज्य सरकारने दारूबंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. अवैध दारू विक्री व गुन्हेगारीतील वाढ रोखण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.

यावर बोलताना मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले की, जिल्ह्यात अवैध दारु मोठ्या प्रमाणावर वाढली होती. लहान बालके, महिला अवैध दारुच्या धंद्यात उतरले होते. तरुण वर्ग अमली पदार्थाच्या आहारी जात होते. त्यामुळं क्राईम वाढले होते. दारू बंदी होताच अवैध दारू सुरू झाली होती. मागील सरकार ने दारू बंदी केली मात्र अंमलबजावणी करू शकले नाही, आंध्र, तेलंगणा आणि अवतीभवतीच्या जिल्ह्यातून दारू येत होती. समितीच्या अहवालानुसार दारू बंदी उठविली आहे, असं वडेट्टीवार म्हणाले.

सरकारच्या या निर्णयावरून आता विरोधकांकडून जोरदार टीका होऊ लागली आहे. भाजपनेते आचार्य तुषार भोसले यांनी देखील या निर्णयावर टीका केली आहे. बार धार्जिणे शरद पवार लक्षद्वीप मधे गोमांसावर बंदी येऊ नये यासाठी प्रयत्न करतात तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चंद्रपुरातील दारूबंदी उठवतात. ‘गोमांस आणि दारु’ ही प्राथमिकता असलेले ‘पवार-ठाकरे’ हे साधु-संतांच्या महाराष्ट्राला लागलेलं ग्रहणच आहे. देवा, माझ्या महाराष्ट्राला लवकर मुक्त कर असं म्हणत त्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा