“पवारांनी स्वतः बोलण्याऐवजी ममता बॅनर्जींच्या तोंडी ‘ते’ वक्तव्य घातलं”

मुंबई : तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी मुंबईत आल्या होत्या. ममता बॅनर्जी यांनी माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली होती. त्यानंतर ममता बॅनर्जीं आणि शरद पवार यांची हि भेट देशात चर्चेचा विषय बनलीय. या भेटीनंतर देशात अनेक चर्चांना सुरुवात झालीय.

ममाताजींनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेसवर निशाणा साधला होता. यूपीए अस्तित्वात नाही, असं त्या म्हणाल्या. ममता बॅनर्जीं यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवरही हल्लाबोल केला होता. तसेच शरद पवार युपीएचे नेते होणार का? असा सवाल ममता बॅनर्जींना विचारण्यात आला होता. त्यावेळी ममता बॅनर्जी भडकल्याचं पहायला मिळाल्या. ‘काय युपीए युपीए करता. युपीए नाहीये आता’, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या.

ममतांच्या या वक्तव्यानंतर मात्र, काँग्रेसला आगामी लोकसभेत डच्चू मिळणार का ? असे प्रश्न उपस्थित होऊ लागले. याबाबत भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यातील काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. राज्यातील सरकार स्थापन झाल्यापासून मी जी भूमिका मांडत आहे. त्याचे काल जे घडले ते उत्तम उदाहरण आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांची भेट झाली.

या भेटी दरम्यान, ममता बॅनर्जी म्हणाल्या, ‘युपीएचे विसर्जन झाले आहे.’मला नाही वाटत की, ते शरद पवार यांच्याशी बोलल्याशिवाय एवढे मोठे वक्तव्य करतील. कारण, महाराष्ट्रात सत्तेमध्ये राहण्याचे जे साधन राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाले आहे. त्यामुळे पवार स्वतः बोलण्या ऐवजी ममता बॅनर्जींच्या तोंडी वक्तव्य घातले आहे. एक प्रकारे या विधानामुळे काँग्रेसलाच स्वतःचे विसर्जन करण्याची वेळ आलेली आहे, अशी टीका ही राधाकृष्ण विखे पाटलांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा