InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

दुसऱ्या फेरीत भाजपच्या भारती पवार यांची आघाडी; महाले पिछाडीवर

- Advertisement -

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात यंदा भाजपाने विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्याऐवजी डॉ. भारती पवार यांना रिंगणात उतरविले आहे. मतमोजणीला सुरुवात झाली असून, दिंडोरीत दुस-या फेरीनंतर भाजपाच्या डॉ. भारती पवार यांनी मुसंडी मारली असून ५१,७३० मते मिळविली असून धनराज महाले यांच्या पारड्यात ३१,३२९ मतं पडली आहेत. पहिल्या फेरीत महाले आघाडीवर होते; मात्र दुस-या फेरीत पवार यांनी मोठी आघाडी घेतली आहे.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात एकूण सतरा लाखांहून अधिक मतदार असून, यंदाच्या निवडणुकीमध्ये नाशिकपेक्षा अधिक ६५ टक्के इतके मतदान दिंडोरीत झाले. पवार यांची लढत माजी आमदार धनराज महाले यांच्याशी होत आहे. तसे पाहिले तर भाजपा व राष्ट्रवादी या दोन्ही प्रमुख पक्षांनी आपले उमेदवार यंदा आयात केले आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात राहतो की राष्ट्रवादीचा कब्जा होतो, याकडे मतदारांचे लक्ष लागून आहे.

- Advertisement -

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.