पवारांचा ‘महेबूब’ ठाकरे सरकारची ‘मेहबूबा’; तुषार भोसलेंचे महाविकास आघाडीवर ताशेरे

अमरावती : आगामी गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी उपमुखमंत्री अजित पवार यांनी नागरिकांना उत्सवात गर्दी झाल्यास निर्बंध लावण्याबाबत निर्णय घ्यावा लागेल, असे संकेत दिले. मात्र दुसरीकडे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख मात्र या आदेशांना धुडकावत असल्याचे दिसत आहे. तसेच कोरोना नियमांचं उल्लंघनही केले आहे.

महेबूब शेख यांचे सध्या विविध ठिकाणी दौरे सुरु आहेत. तसेच त्यांच्या कार्यक्रमांना लोक हजेरी लावत असून ठिकठिकाणी जाऊन गर्दी जमवत असल्याचे दिसून येत आहे. शेख हे काल दर्यापुर तालुका जिल्हा अमरावती येथे रात्री १२:३० वाजता पोहचले. यावेळी त्यांच्या उपस्थितीत याठिकाणी गर्दी झाल्याचं निदर्शनास आलं. यावरून भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रदेश संयोजक आचार्य तुषार भोसले यांनी चांगलंच धारेवर धरलं आहे.

मंदिरे उघडण्यासाठी केलेल्या आंदोलन केल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो असं म्हणत महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून टीका केली जाते. मग या गर्दीतून अजिबात कोरोनाचा धोका नाही, कारण ती सरकारी पक्षांच्या फायद्याची आहे. कोरोना फक्त मंदिरातून पसरतो जिथे देव-भक्तांची भेट होते आणि लाखो गरीबांचे पोट भरते, असा खोचक टोला यावेळी तुषार भोसले यांनी लगावला आहे.

गर्दी होऊ नये म्हणुन आम्ही मंदिरे बंद ठेवतो आहोत अशी सतत टिमकी वाजवण्यात शरद पवार, संजय राऊतांपासून ठाकरे सरकारचे मंत्री-नेते गर्क आहेत.पण सरकारच्या सर्वच नियम-कायद्यातून नेहमीच सूट मिळते ती फक्त महेबूब शेख यांना. कारण पवारांचा महेबूब ठाकरे सरकारची मेहबूबा आहे, असं म्हणत सत्ताधारी महाविकास आघाडी वर ताशेरे ओढले आहेत.

महत्वाच्या बातम्या

 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा