पवारसाहेबांचे एस.टी. कामगारांशी जिव्हाळ्याचे संबंध; जितेंद्र आव्हाडांचा विरोधकांवर निशाणा

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या या आदोलनाला भाजपकडून पाठींबा देण्यात आला असून भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी मुंबईतील आझाद मैदानावर गेल्या अनेक दिवसांपासून मुक्काम ठोकला आहे. हे दोघे या आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही अशा ठाम भूमिका काही एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. याच सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यात आज महत्वपूर्ण बैठक झाली. मात्र आज चार तास झालेल्या या बैठकीत काहीही ठोस निर्णय झाला नसल्याची माहिती समोर आली आहे.
यानंतर विरोधकांनी पवारांवर निशाणा साधण्यास सुरुवात केली. यावरून गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत विरोधकांना खडेबोल सुनावले. आव्हाड ट्विटमध्ये म्हणाले की, गेल्या ४० वर्षांपासून एस. टी. कामगारांच्या समस्या आणि एस.टी. कामगारांशी आदरणीय शरद पवार साहेबांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे त्यांच्या घरी किंवा त्यांच्यासमवेत बैठक झाल्यास त्यात वावगे काय? असा सवालही आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.
तसेच नेत्यांनी अत्यंत जबाबदारीने श्रमिकांचा विचार केला पाहिजे. त्यांचे शोषण थांबवले पाहिजे. आणि जे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष त्यांच्या शोषणाला, त्यांना उद्ध्वस्त करायला कारणीभूत ठरतात; त्यांना खड्यासारख बाहेर ठेवलं पाहिजे. आणि तेच काम आदरणीय शरद पवार साहेब करतील.” असेही आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- “परिवहन मंत्री केवळ मुख्यमंत्र्यांचे कलेक्टर आहेत”
- मोठी बातमी : रुपाली पाटील मनसे सोडणार?, मोठे वक्तव्य केल्याने चर्चा सुरु
- चंद्रकांत पाटलांच्या सत्ताबदलाच्या वक्तव्यावरुन संजय राऊतांचा खोचक सल्ला; म्हणाले, आधी…
- ‘एसटी संपाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्याशी चर्चा करणार’
- ‘नवीन वर्षात भाजपचं सरकार येणार’; चंद्रकांत पाटलांचा मोठा दावा