बलात्कार प्रकरणी पर्ल वी. पुरीला समर्थन करणाऱ्यांवर भडकली अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्या

‘नागिग ३’ फेम अभिनेता पर्ल वी. पुरीला एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी अटक केली आहे. यावर अनेक सेलिब्रिटींनी पर्ल निर्दोष असल्याचं म्हणत त्याला पाठिंबा दिलाय. या सेलिब्रिटींवर आता अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्या चांगलीच भडकलीय.

सपोर्ट करणाऱ्या सेलिब्रिटींवर अभिनेत्री देवोलिनाने नाव न घेता निशाणा साधला आहे. देवोलीनाने ट्विटरवर काही पोस्ट शेअर करत संताप व्यत केलाय. “थोडी तरी माणुसकी दाखवा. किती घाणेरडे लोक आहात तुम्ही, मूर्खांनो डिक्शनरी उघडा आणि ‘सहानभूती’ या शब्दाचा अर्थ जाणून घ्या. या वायफळ चर्चा थांबवा आणि कोर्टाला काय ते ठरवू द्या. माणूसकीची हीन पातळी.” अशा आशयाची पोस्ट देवोलीनाने  शेअर केलीय.

तर पीडित मुलीच्या आईला इन्स्टाग्रामवर कमेंट करून छळणाऱ्या नेटकऱ्यांवर देखील देवोलीना भडकली आहे. “तुमच्यात थोडी जरी माणुसकी असती तर त्या लहान मुलीच्या आईच्या अकाऊंटवर जाऊन कमेंट करण्याआधी शंभर वेळा विचार केला असता. तुमच्या सोशल मीडिया अकाऊंटमुळे त्याला कोणत्याही प्रकारची मदत होणार नाही. मात्र त्या चुमकल्या मुलीचं आयुष्य उद्धवस्त करणाऱ्या तुम्हा प्रत्येकाला कर्माची फळं भोगावीच लागतील. आंदोलनं करा, हरताळ करा आणि दाखवा तुमचा पाठिंबा. पण ही घाण पसरणं बंद करा.” असं देवोलीना म्हणालीय.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा