पेगॅस प्रकरणाची चौकशी व्हायला हवी : सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसापासून पेगॅस प्रकरण देशात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. इस्राईलच्या पेगॅसस स्पायवेअरचा वापर करुन हेरगिरी केल्याचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहचलं आहे. या प्रकरणी दाखल याचिकांवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने पेगसस प्रकरणातील आरोप गंभीर असल्याचं म्हटलंय.

पुढे यातील सत्य समोर यायल हवं असं मत नोंदवलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी 9 याचिकांवर सुनावणी केली. सरन्यायाधीश ए. व्ही. रमण यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली. सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या खंडपीठासमोर याचिकावर सुनावणी झाली. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

व्यक्तिगतपणे जे या प्रकरणात पिडित आहेत. त्यांनी याविषयी याचिका का दाखल केली नाही?, असा सवाल खंडपीठानं उपस्थित केला आहे. तर हे प्रकरण जर 2019चं आहे तर यावर आताच का याचिका दाखल केल्या गेल्या?, असाही सवाल न्यायालयाने विचारला आहे. 2019 मध्ये कोणत्या व्यक्तींची हेरगिरी सुरू आहे याची माहिती समोर आली नव्हती. पण आता 2021 मध्ये नावं समोर आल्यानं याचिका दाखल केल्याचं वकिल कपिल सिब्बल यांनी न्यायालयात सांगितलं.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा