जनता भोळी जरूर आहे पण मुर्ख नाही : चंद्रकांत पाटील

मुंबई : ओबीसी आरक्षणाचा मुद्दा राज्यात सध्या ऐरणीवर आहे. महाविकास आघाडी सरकारने ओबीसी आरक्षणासाठी नुकताच मोठा निर्णय घेतला आहे. ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासाठी राज्य सरकार अध्यादेश काढणार असल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलं आहे. मात्र ओबीसी आरक्षणावरुन भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत संघर्ष सुरुच राहणार असल्याचे भाजपकडून स्पष्ट कऱण्यात आले आहे.

याच सगळ्या पार्शभूमीआवर आता भाजप प्रदेशाध्याक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.तसेच महाविकास आघाडी सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला हे संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी समाजाला कळून चुकले आहे. ‘जनता भोळी जरूर आहे, पण मूर्ख नाही हे महाविकास आघाडी सरकारने लक्षात ठेवावे असा सूचक इशारा पाटलांनी ठाकरे सरकारला दिला आहे.

तसेच नाना पटोले ओबीसी आरक्षणावरुन केंद्राकडे बोट दाखवून ओबीसी समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. परंतु मधल्या काळात पटोले यांनीच राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात वकील देत नाही, असा आरोप केला होता, याचा बहुदा त्यांना विसर पडला असावा, याकडं पाटील यांनी लक्ष वेधलं. ओबीसी समाजाने सरकारला दणका द्यायला पाहिजे असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा