अहंकारी शासनाला जनता झुकवू शकते : बाळासाहेब थोरात

मुंबई: नवे कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केल्यानंतर विरोधी पक्षाकडून शेतकऱ्यांचं अभिनंदन केलं जात आहे. त्याचप्रमाणे, केंद्र सरकारवर टीकेची झोड उठली आहे. ‘केंद्र सरकारच्या भूमिकेमुळं शेकडो शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला आहे. त्याची जबाबदारी सरकारला स्वीकारावीच लागेल. त्यामुळं सरकारनं अन्नदात्याची माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

याबाबत थोरात यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, कितीही मोठ्या अहंकारी शासनाला जनता झुकावू शकते, हे पुन्हा सिद्ध झाले. “आगामी विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या भितीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन काळे कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. हा गेल्या एक वर्षापासून ऊन, पाऊस आणि रक्त गोठवणाऱ्या थंडीत दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या देशभरातील शेतकऱ्यांच्या लढ्याचा विजय आहे.”

“शेतकऱ्यांना खलिस्तानी म्हणून बदनाम करण्याचा प्रयत्न केला. रक्त गोठवणाऱ्या थंडीत शेतकऱ्यांवर पाण्याचा मारा केला, रस्त्यावर खिळे ठोकून त्यांना अडविले गेले.या अत्याचाराची जबाबदारी मोदी सरकारला टाळता येणार नाही.” “या शेतकरी आंदोलनादरम्यान शेतकरी बांधवांना आपला जीव गमवावा लागला, काही शेतकरी बांधवांना गाडीखाली चिरडून मारले गेले, त्याचीही जबाबदारी मोदी सरकारला घ्यावी लागेल आणि अन्नदात्याची माफी मागावी लागेल.”

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा