शेतकरी आंदोलनात भेंडीबाजारातील लोक घुसवले; दरेकरांची आंदोलनावर टीकास्त्र

मुंबई : कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता ६० दिवस उलटून गेलेत. केंद्रातील मोदी सरकारकडून लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्यांविरोधात २६ नोव्हेंबरपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेत. दिल्लीत सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं लाल वादळ काल रात्री अखेर मुंबईत दाखल झालं.

आंदोलनादरम्यान झालेल्या सभेवेळी केंद्र सरकार व भाजपवर महाविकास आघाडीतील नेत्यांसह शेतकरी नेत्यांनी देखील टीकास्त्र सोडल्याचं दिसून आलं.या आंदोलनावर भाजप नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सडकून टीका केली आहे.

मराठा आंदोलकांची भेट घेऊन येताना शेतकरी आंदोलनासाठी शेतकरी असे फलक घेतलेल्या काही व्यक्ती दिसल्या. त्यांना जाऊन विचारले कुठून आला आहात, यावेळी त्यांनी भेंडी बाजारमधून असं उत्तर दिलं. काही लोक हे प्रामाणिकपणे आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. मात्र सर्वाधिक लोक हे आणली गेलेली आहेत, अशी टीका दरेकर यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.