InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

मराठा समाजाच्या आंदोलनात अन्य समाजाचे लोक घुसले- अंबादास दानवे

- Advertisement -

मराठा समाजाच्या आंदोलनात अन्य समाजचे लोक घुसले आहे, आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शिवसेनेचे औरंगाबाद जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी केला आहे. मराठा आंदोलकांना शिवीगाळ करत घोषणा देणाऱ्या आंदोलकाला लाथा मारल्याचा दानवे यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे.

मराठा समाजाकडून काल आरक्षणाच्या मागणीसाठी ‘महाराष्ट्र बंद’ची घोषणा करण्यात आली होती. त्याच निमित्ताने औरंगाबादच्या क्रांती चौकात ठिय्या आंदोलनाचं आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनस्थळी सकाळी शिवसेनेचे औरंगाबाद जिल्हाप्रमुख अंबादास दानवे आले होते.

Loading...

- Advertisement -

यावेळी आंदोलकांनी उद्धव ठाकरे मुर्दाबाद अश्या घोषणा देऊ लागले. त्यामुळे अंबादास दानवे यांचा पारा चढला आणि त्यांनी मराठा आंदोलकांना शिवीगाळ करत घोषणा देणाऱ्या आंदोलकाला लाथा मारल्या . दरम्यान आंदोलकांनीही अंबादास दानवे यांना धक्काबुकी करत चोप दिला.

Loading...

घडलेला प्रकारचं समर्थन करतांना दानवे म्हणले की,  मराठा समाजाच्या आंदोलनात अन्य समाजचे लोक घुसले आहे, आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. मी मराठा समाजाचा कार्यकर्ता आहे, समोर हि मराठा समाजाचे कार्यकर्ते आहेत. तसेच शिवसैनिकही आहे. शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या विरोधात अपशब्द खपवून घेऊ शकत नाही. पुढे बोलतांना ते म्हणाले मी कुठलेही प्रकारची मारहाण केलेली नाही. मी फक्त धावून गेलो होतो, लाथ मारली नाही, फक्त गळा पकडल्याचं ते सांगत आहे.  घडलेला प्रकाराचं मी समर्थन करतो,  मी काही चूक केली नसल्याचं ते बोलत होते.

दरम्यान घडलेल्या प्रकारानंतर आंदोलकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटलेल्या. दानवे आंदोलनात फूट पाडण्याचे काम करत आहे तसेच दोन समाजात तेढ निर्माण करण्याचं काम दानवे हे करत असल्याचं आंदोलकांनी सांगितले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.