‘सत्तेसाठी भाजपची लोकं दगडं मारायला कमी करणार नाही’, बाळासाहेब थोरातांच टीकास्त्र

ठाणे : गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यात आगामी महागरपालिकांच्या निवडणुकीचं वारं वाहू लागलं आहे. याचदरम्यान प्रत्येक पक्ष कामाला लागला आहे.काॅंग्रेसचे नेते आणि महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांची ठाण्यात काल पक्षीय बैठक पार पडली. यावेळी त्यांनी ठाण्यातील काॅंग्रेस कार्यकर्त्यांशी सवांद साधला. तेव्हा बाळासाहेब थोरातांनी पत्रकारांशी बोलताना भाजपवर निशाणा साधलाय.
‘दर आठवड्याला सरकार पडेल या आकांक्षाने भाजपमधील अनेक लोक मंत्रिपद मिळेल याकरता नवीन कपडे शिवतात पण त्यांना काही मुहूर्त लागत नाही. भाजप सत्ते करता इतकी हपापलेली आहे की, आता ते लोकांना दगड मारले कमी करणार नाही’ असा सणसणीत टोला बाळासाहेब थोरात यांनी भाजपला लगावला.
तसेच पुढे केंंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून महाविकास आघाडीचं सरकार कसं पाडता येईल, याचा डाव रोज भाजप आखत आहे. परंतु आता केंद्रीय यंत्रणांचाच डाव भाजपवर उलटणार आहे. भाजपमध्ये गेलेल्या मंत्र्यांनीच आता कबूल केलं आहे की आम्हाला आता सुखाची झोप लागते. कारण त्याठिकाणी कोणतीही कारवाई नाही, असंही बाळासाहेब थोरातांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- “कासवाला सुद्धा लाज वाटेल, अशा गतीने ठाकरे सरकार काम करतंय”
- .. तर पवारसाहेबांचे महाराष्ट्रमध्ये महत्त्व असते; निलेश राणेंची घणाघाती टीका
- ड्रग्ससारख्या संवेदनशील विषयावर आर्यन खानची पाठराखण लाजिरवाणी, मुनगंटीवारांची शिवसेनेवर टीका
- पुन्हा एकदा भाजप-मनसे युतीची चर्चा ; राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यानंतर निर्णय?
- ‘जाऊ तिथं खाऊ आणि चोर चोर मावसभाऊ’; सदाभाऊ कडाडले