महाराष्ट्रातील जनतेनं उचापात्या करणाऱ्या लोकांना बळी पडू नये : उद्धव ठाकरे

मुंबई : गेले २ वर्षे झालं आपण सर्व कोरोना महामारीशी लढत आहेत. यानंतर आता दुसऱ्या लाटेचा धोका कमी झाला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात येऊ लागलीय. यानंतर आता राज्य सरकारकडून निर्बंध शिथिल करण्यात आले. पण, दुसरीकडे मंदिरं, लोकल सुरू करण्याबाबत भाजपने आंदोलन केले होते. मात्र आता भाजपच्या या आंदोलनावर खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधलाय.

‘हे उघडा ते उघडा असं काही जण म्हणत आहे. महाराष्ट्रातील काही घटक लोकांची माथी भडकावत आहे. पण महाराष्ट्रातील जनतेनं अशा उचापात्या करणाऱ्या लोकांना बळी पडू नये’ असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. आज देशभर महाराष्ट्र मॉडेलचं कौतुक होत आहे हे आमचं कौतुक नाहीतर जनतेचं आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरेंनी रविवारी जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं होत.

दरम्यान, दुकानं खुली ठेवावी अशी मागणी होत आहे. मी तर म्हणतो 24 तास दुकानं उघडी ठेवूया, पण कामाच्या वेळेत बदल करावा लागणार आहे. जिथे गर्दी वाढली तिथे रुग्ण वाढले आहे. त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट, मंदिर खुली करण्यासाठी 8 दिवस लागणार आहे. कोरोना गेला आहे, तर दुकानं उघडा, अशी मागणी करत आहेत. लोकांचा संयम सुटत चालला आहे पण संयम ठेवावा लागणारे, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा