InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

ममता बॅनर्जी यांना जनता नमविल्याशिवाय राहणार नाही – देवेंद्र फडणवीस

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या कोलकत्यामधील रोड शोमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. कार्यकर्त्यांकडून दगडफेक देखील करण्यात आली. या घटनेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांनी निषेध केला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नेत्यांच्या सभांना परवानगी नाकारली जात असून, जणू हे राज्य म्हणजे केवळ ममतांची मालकी असे समजून राज्य कारभार हाकला जात आहे. अनेक भाजपा कार्यकर्त्यांच्या पश्चिम बंगालमध्ये हत्या करण्यात आल्या आहेत.

या निवडणुकीत सर्वाधिक हिंसाचार हा पश्चिम बंगालमध्येच झाला. ममता बॅनर्जी यांना आता तेथील जनता नमविल्याशिवाय राहणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply