लोकांना कधीकधी वाटतं, अजून यौवनात मी, अजूनही मी मुख्यमंत्री; राऊतांचा फडणवीसांना टोला

मुंबई : नवी मुंबईतील बेलापूर येथे मंदा म्हात्रे यांनी महिला मासळी विक्रेता परवाना वितरण समारंभ कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मी पुन्हा येईन…मी पुन्हा येईन…हा माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षेनेते देवेंद्र फडणवीस यांचा डायलॉग चांगलाच गाजला.

या कार्यक्रमात ते बोलताना म्हणाले होते कि, तुमच्यासारखे नेते माझ्या पाठिशी असल्यामुळे मला एकही दिवस जाणवलं नाही की मुख्यमंत्री नाही. मला असं वाटतं मी आजही मुख्यमंत्रीच आहे. तुम्ही मला त्याची कमतरता जाणवू दिली नाही, असं जाहीर विधान फडणवीसांनी यावेळी बोलताना केलं होत. आता त्यांच्या या वक्तव्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टोला लगावला आहे.

लोकांना कधीकधी वाटतं, अजून यौवनात मी असं एक नाटक रंगमचावर गाजलं आहे. तसंच काहींना वाटतं की, अजून यौवनात मी, अजूनही मी मुख्यमंत्री. तसंच दिल्लीत गेल्यावरही आम्हाला कधीकधी वाटतं की आमचाच पंतप्रधान आहे. तसेच लोकांना स्वप्न पहायला आवडतात. त्यांची भावना योग्य आहे. त्यांच्या स्वप्नांनाही यश यावं आणि आकाशात उडण्यासाठी बळ यावं. अशा शुभेच्छा देत संजय राऊतांनी निशाणा साधला आहे.

महत्वाच्या बातम्या

 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा