InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

काळे कपडे घातलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनाही मोदींच्या सभेत ‘नो एंट्री’

काळे कपडे घातलेला कोणताही व्यक्ती सभेला येऊन मोदींचा निषेध करेल की काय? या धास्तीमुळे पोलिसांनी चक्क भाजपच्या कार्यकर्त्यांनाही सभेच्या ठिकाणी येऊ दिले नाही. अनेक तरुण कार्यकर्ते, महिला यांना कल्याणमध्ये येऊन पुन्हा माघारी फिरावे लागत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कल्याणच्या वासुदेव बळवंत फडके मैदानावर जाहीर सभा होत आहे. मात्र या सभेला काळे कपडे घातलेल्या कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना नो एंट्री आहे. त्यामुळे काळे कपडे घातलेल्या नागरिकांना पोलिसांनी बाहेरच थांबण्यास सांगितले आहे. काँग्रेसने मोदींना काळे झेंडे दाखविण्याचा इशारा दिला होता. त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी काळे कपडे घातलेल्या नागरिकांना सभेला येण्यास मनाई केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर कल्याणातील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्याना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply