“भाजपला बंगालमध्ये जनतेनं जे ऊत्तर दिलं तेच ऊत्तर त्यांना महाराष्ट्रात मिळेल”

मुंबई : काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भ्रष्टाचाराचा आरोप करत केंद्रानं यंत्रणेचा वापर केला तर महाराष्ट्रातील अर्ध मंत्रिमंडळ तुरुंगात गेलं असतं असं वक्तव्य केलं होतं. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत भाजपला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.

भ्रष्टाचारासाठी सॉफ्टवेअर केल्याचा आरोप फडणवीसांनी केला होता त्यावर नवाब मलिकांनी फडणवीस सरकारच्या काळात डिजीटल दलाल होता. फडणवीस सरकारच्या काळात काय- काय घोटाळे झाले हे लवकरच बाहेर काढू, असा इशारा नवाब मलिकांनी दिला.

“माजी मुख्यमंत्री देवेंद्र सांगितलंय की केंद्रानं यंत्रणांचा वापर केला असता अर्ध मंत्रिमंडळ तुरूंगात दिसलं असतं. आम्ही म्हणतो की पूर्ण मंत्रिमंडळ तुरूंगात टाका. जनता पाहतेय, बंगालमध्ये जनतेनं जे ऊत्तर दिलं तेच ऊत्तर तुम्हाला इथे मिळेल”, असं नवाब मलिक पत्रकार परिषदेत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा