InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

‘शरद पवारांविरोधात कट-कारस्थान करणाऱ्यांना जनता धडा शिकवणार’-जयंत पाटील

- Advertisement -

‘शरद पवार यांच्याविरोधात कट-कारस्थान करणाऱ्या भाजप-सेनेला धडा शिकवण्यासाठी जनता एकवटली आहे,’ असं म्हणत ईडीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. सांगलीत बोलताना जयंत पाटील यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं.

‘आम्ही मातीतील कुस्ती खेळणारे पैलवान आहोत. पण मुख्यमंत्र्यांनी तेल लावलेले फोटो लावलेला प्रसिद्ध करावा. एकदा कळू द्या तेल लावल्यावर कसे दिसत आहेत,’ असं म्हणत जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आव्हानाची खिल्ली उडवली आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर केलेली खालच्या स्तरातील टीका महाराष्ट्र सहन करणार नाही,’ असंही जयंत पाटलांनी म्हटलं आहे.विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तापरिवर्तन होणार असून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता येणार आहे, असा दावा जयंत पाटील यांनी केला आहे

Loading...

- Advertisement -

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.