Periods | वेळेवर मासिक पाळी येत नसेल, तर करा ‘या’ पदार्थांचे सेवन

Periods | टीम महराष्ट्र देशा: मासिक पाळी (Periods) ही स्त्रियांमध्ये होणारी एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. नियमित मासिक पाळी येण्याचा अर्थ असा होतो की स्त्रियांच्या शरीराने गर्भधारणेची क्षमता मिळवण्याची पहिली पायरी ओलांडली आहे. त्याचबरोबर मासिक पाळीची सुरुवात होणे म्हणजे लैंगिक अवस्थेची सुरुवात होणे होय. महिलांना दर महिन्याला मासिक पाळीला सामोरे जावे लागते. पण अनेक महिलांना बदलत्या जीवनशैलीमुळे आणि योग्य आहार न घेतल्यामुळे अनियमित मासिक पाळीची समस्या निर्माण होते. अनियमित मासिक पाळी आरोग्यासाठी चांगली नाही. त्यामुळे तुम्ही पण अनियमित मासिक पाळीच्या समस्याला झुंज देत असाल, तरी बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला अनियमित मासिक पाळी झाल्यास काय करावे याबद्दल माहिती सांगणार आहोत. अनियमित मासिक पाळीची समस्या निर्माण झाल्यावर तुम्ही पुढील पदार्थांचे सेवन करू शकतात.

पपई

पपईचे नियमित सेवनाने मासिक पाळी नियमित येण्यास मदत होते. पपईमध्ये आढळणारे कॅरोटीन तत्व अनियमित मासिक पाळीची समस्या दूर करतात. त्यामुळे तुम्ही जर अनियमित मासिक पाळीच्या समस्येला त्रस्त असाल, तर तुम्ही तारखेपूर्वी पपई खाणे सुरू केले पाहिजे.

दालचिनी

दालचिनी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. त्याचबरोबर दालचिनीचे सेवनाने तुम्ही अनियमित मासिक पाळीच्या समस्येवर मात करू शकतात. तुम्ही चहा किंवा कॉफीमध्ये चिमूटभर दालचिनी पावडर टाकून त्याचे सेवन करू शकतात. त्याचबरोबर तुम्ही पाण्यासोबत देखील दालचिनीचे सेवन करू शकतात. यासाठी तुम्हाला एक कप पाण्यामध्ये थोडीशी दालचिनी पावडर टाकून घ्यावी लागेल. त्यानंतर तुम्हाला हे पाणी अर्धे होईपर्यंत उकळावे लागेल. हे पाणी कोमट झाल्यावर तुम्हाला त्याचे सेवन करावे लागेल. या पाण्याचे सेवन केल्याने अनियमित मासिक पाळीची समस्या दूर होईल.

आले

आले आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. आल्याच्या नियमित सेवनाने अनियमित मासिक पाळीची समस्या दूर होऊ शकते. यासाठी तुम्ही चहामध्ये आल्याचे सेवन करू शकतात. नियमित आल्याचे सेवन केल्याने अनियमित मासिक पाळीची समस्या कमी होईल. त्याचबरोबर याच्या नियमित सेवनाने शरीराला अनेक फायदे मिळतील.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या