Periods Hacks | महिलांनी पीरियड्समध्ये चुकूनही करू नये ‘या’ चुका

टीम महाराष्ट्र देशा: मासिक पाळी (Periods) ही स्त्रियांमध्ये होणारी एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. नियमित मासिक पाळी येण्याचा अर्थ असा होतो की स्त्रियांच्या शरीराने गर्भधारणेची क्षमता मिळवण्याची पहिली पायरी ओलांडली आहे. त्याचबरोबर मासिक पाळीची सुरुवात होणे म्हणजे लैंगिक व्यवस्थेची सुरुवात होणे होय. महिलांना दर महिन्याला मासिक पाळीला सामोरे जावे लागते. मासिक पाळी दरम्यान काही महिलांना खूप वेदना होतात, तर काहींना ओव्हर फ्लो, पाठ दुखीचा त्रास लूज मोशन आणि उलट्या होतात. अशा परिस्थितीमध्ये महिला अनेक प्रकारच्या औषधी घेतात. त्याचबरोबर पीरियड्स दरम्यान महिला अनेक वेळा काही चुका करतात. ज्यामुळे त्यांना खूप त्रास होऊ शकतो. त्या चुका टाळण्यासाठी पीरियड्स दरम्यान काय करू नये याबद्दल बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत.

पीरियड्स (Periods) मध्ये बेक केलेले पदार्थ खाऊ नये

बेक केलेले अन्नपदार्थ खायला खूप चविष्ट लागतात. त्याचबरोबर त्यामध्ये ट्रान्स फॅट ही भरपूर प्रमाणात उपलब्ध असते. त्यामुळे तुमची इस्ट्रोजन पातळी वाढू शकते. त्यामुळे तुमच्या गर्भाशयात होणाऱ्या वेदना वाढू शकतात आणि तुम्हाला पीरियड्समध्ये जास्त त्रास होऊ शकतो. त्यामुळे हा त्रास टाळण्यासाठी पीरियड्समध्ये बेक केलेले अन्नपदार्थ खायचे टाळावे.

पीरियड्स (Periods) दरम्यान फास्ट फूड पासून दूर राहा

पीरियड्स काळामध्ये आपल्याला पोटाला आराम द्यावा लागतो. त्यामुळे अशा परिस्थितीत पोटाला त्रास होणार नाही असे कोणतेही पदार्थ खाऊ नका. यामध्ये प्रामुख्याने कॉफी, कोल्ड्रिंक्स, जास्त सोडियम असलेले पदार्थ, मसालेदार पदार्थ इत्यादीचे सेवन करणे टाळावे. कारण या पदार्थांचे सेवन केल्यावर तुमच्या वेदना वाढू शकतात. त्यामुळे या वेदना टाळण्यासाठी पिरेड्स मध्ये फास्ट फूड पासून लांब राहावे.

पीरियड्समध्ये बॉडीला हायड्रेट ठेवावे

पीरियड्समध्ये बॉडीला हायड्रेट ठेवणे खूप महत्त्वाचे असते. कारण या दरम्यान बॉडी हायड्रेट नसेल तर तुम्हाला आणखी त्रास होऊ शकतो. त्यामुळे पीरियड्समध्ये बॉडीला हायड्रेट ठेवले पाहिजे. त्यासाठी तुम्ही पाण्याबरोबर काकडी, नारळ पाणी आणि ज्यूसचे सेवन करू शकता.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.