Periods Pain | मासिक पाळीच्या वेदनेपासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ आयुर्वेदिक उपाय

Periods Pain | टीम महाराष्ट्र देशा: महिलांना मासिक पाळी दरम्यान अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मासिक पाळी सुरू असताना पोट दुखी, मळमळ, उलट्या यासारख्या समस्या निर्माण होतात. त्याचबरोबर बहुतांश महिलांना या कालावधीमध्ये असह्य वेदनांना सामोरे जावे लागते. मासिक पाळीतील वेदना कमी करण्यासाठी बहुतांश महिला पेन किलर किंवा औषधांचे सेवन करतात. मात्र, ही औषधे आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. त्यामुळे मासिक पाळीतील वेदना दूर करण्यासाठी तुम्ही काही आयुर्वेदिक उपायांचा अवलंब करू शकतात. या वेदनांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही पुढील आयुर्वेदिक उपाय करू शकतात.

ओवा (Owa-For Periods Pain)

प्रत्येक भारतीय स्वयंपाक घरामध्ये ओवा सहज उपलब्ध असतो. मासिक पाळीतील समस्यांवर मात करण्यासाठी ओवा एक रामबाण उपाय ठरू शकतो. यासाठी तुम्हाला ओवा एक ग्लास पाण्यामध्ये उकळून घ्यावा लागेल. त्यानंतर तुम्हाला या पाण्याचे दिवसातून दोन ते तीन वेळा मध मिसळून सेवन करावे लागेल. या पाण्याचे सेवन केल्याने पोटदुखीच्या समस्येपासून आराम मिळू शकतो.

हळद आणि जायफळ (Turmeric and Nutmeg-For Periods Pain)

हळदीमध्ये अँटिइफ्लेमेटरी गुणधर्म आढळून येतात, जे पोटदुखीच्या समस्यांवर मात करण्यास मदत करतात. पोट दुखीच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही हळद आणि जायफळाचे एकत्र सेवन करू शकतात. यासाठी तुम्हाला दुधामध्ये चिमूटभर हळद आणि जायफळ मिसळून झोपण्यापूर्वी त्याचे सेवन करावे लागेल. या पेयाचे सेवन केल्याने मासिक पाळीतील वेदनांपासून आराम मिळू शकतो आणि चांगली झोप लागू शकते.

तुळस (Basil-For Periods Pain)

तुळशीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळून येतात. त्याचबरोबर तुळशीमध्ये आढळणारे कॉफीक ॲसिड मासिक पाळीतील वेदनांपासून आराम देते. यासाठी तुम्हाला सहा ते सात तुळशीची पाने एक कप पाण्यामध्ये उकळून घ्यावे लागेल. हे पाणी कोमट झाल्यावर तुम्हाला त्याचे सेवन करावे लागेल. या पाण्याचे सेवन केल्याने तुम्हाला मासिक पाळीतील वेदनांपासून सुटका मिळू शकतो.

आल्याचा चहा (Ginger Tea-For Periods Pain)

मासिक पाळीच्या वेदनांपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही आल्याचे चहाचे सेवन करू शकतात. आल्यामध्ये अँटिइफ्लेमेटरी गुणधर्म आढळून येतात. हे गुणधर्म या वेदना कमी करण्यास मदत करतात. मासिक पाळीच्या वेदनेतून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही दिवसातून दोन वेळा या चहाचे सेवन करू शकतात. दोन पेक्षा जास्त वेळा या चहाचे सेवन केल्याने ॲसिडिटीची समस्या वाढू शकते.

हळदीचे दूध (Haldi Milk-For Periods Pain)

मासिक पाळीमध्ये हळदीच्या दुधाचे सेवन केल्याने वेदना कमी होऊ शकतात. हळदीच्या दुधाचे सेवन केल्याने पोट दुखणे कमी होऊ शकते. त्याचबरोबर या दुधाचे सेवन केल्याने सूज येण्याची समस्या देखील दूर होऊ शकते. त्यामुळे मासिक पाळीमध्ये हळदीच्या दुधाचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.