Periods Pain | मासिक पाळीमध्ये खूप वेदना होत आहेत? तर करा ‘हे’ उपाय

Periods Pain : वेळेवर मासिक पाळी येणे हे एका स्त्रीसाठी निरोगी असण्याचे लक्षण आहे. मात्र, कधीकधी बदलती जीवनशैली आणि पौष्टिक आहाराच्या कमतरतेमुळे मासिक पाळी वेळेवर येत नाही. त्यामुळे महिलांना वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्याचबरोबर अनेक महिलांना मासिक पाळी दरम्यान असाह्य वेदनांचा सामना करावा लागतो. या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी बहुतांश महिला मेडिकलमध्ये उपलब्ध असलेल्या औषधांचे सेवन करतात. मात्र, ही औषधे शरीरासाठी घातक ठरू शकतात. त्यामुळे मासिक पाळीतील वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकतात. मासिक पाळीतील वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात पुढील गोष्टींचा समावेश करू शकतात.

आल्याचा चहा (Ginger Tea to Reduce Periods Pain)

मासिक पाळीच्या वेदनांपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही आल्याचे चहाचे सेवन करू शकतात. आल्यामध्ये अँटिइफ्लेमेटरी गुणधर्म आढळून येतात. हे गुणधर्म या वेदना कमी करण्यास मदत करतात. मासिक पाळीच्या वेदनेतून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही दिवसातून दोन वेळा या चहाचे सेवन करू शकतात. दोन पेक्षा जास्त वेळा या चहाचे सेवन केल्याने ॲसिडिटीची समस्या वाढू शकते.

हळदीचे दूध (Haldi Milk to Reduce Periods Pain)

मासिक पाळीमध्ये हळदीच्या दुधाचे सेवन केल्याने वेदना कमी होऊ शकतात. हळदीच्या दुधाचे सेवन केल्याने पोट दुखणे कमी होऊ शकते. त्याचबरोबर या दुधाचे सेवन केल्याने सूज येण्याची समस्या देखील दूर होऊ शकते. त्यामुळे मासिक पाळीमध्ये हळदीच्या दुधाचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते.

दूध आणि काजू (Milk & Cashews to Reduce Periods Pain)

मासिक पाळीतील वेदनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात दूध आणि काजूचा समावेश करू शकतात. दुधासोबत काजूचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. मासिक पाळी दरम्यान तुमचे पोट खूप दुखत असेल, तर तुम्ही दुधासोबत काजूचे सेवन करू शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या-