InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

अलमट्टी वादावर कायमस्वरुपी तोडगा! शरद पवारांनी सुचवला ‘हा’ मार्ग

- Advertisement -

शरद पवार सध्या दोन दिवस पूरग्रस्त भागात आहेत. ते स्वत तेथे जाऊन पाहणी करत आहेत. पूरग्रस्तांचं कर्ज माफ करा. त्यांना घरं बांधून द्या, मजुरांना काम देऊन त्यांना जगवा आणि गावातील रस्ते, वीज या सर्वांची तरतूद करा अशी मागणी शरद पवार यांनी सरकारकडे केली आहे.

अलमट्टी धरण आणि पूर यावर ते म्हणाले, “कर्नाटकातील अलमट्टी धरणाचे पाणी जर लवकर सोडले असते, तर सांगली-कोल्हापुरात आज ही वेळ आली नसती. कर्नाटक सरकारच्या मते महाराष्ट्राने पाण्याचं नियोजन केलं नाही असे म्हणतायेत परंतू त्यात तथ्य नाही. मी मुख्यमंत्र्यांशी बोललो, त्यांनीही आपण कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी बोलल्याचं सांगितलं. शिवाय अलमट्टीतून पाणी सोडण्याची व्यवस्था केल्याचं म्हणाले. पण आम्ही काही लोक पाठवले आणि त्यांच्याकडून आलेल्या रिपोर्टनुसार खाली अजिबात विसर्ग नाही, अलमट्टीतून अद्याप पाणी सोडत नाहीत. त्यामुळे पंचगंगेचा फुगवटा वाढल्याचं नाकारता येत नाही. असे पवार म्हणाले.

- Advertisement -

अखेर पंतप्रधांशी माझी बोलणी झाल्यानंतर केंद्राचे म्हणणे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना ऐकावे लागले असे दिसते, परंतू कर्नाटक सरकार जे पाच लाख क्यूसेकने पाणी सोडल्याचा दावा करत होते, शिवाय आपल्या माध्यमांतून अशा बातम्या येत होत्या, परंतू तेथेही कर्नाटक सरकारने खोटी माहिती दिल्याचे लक्षात येते. माझ्या रिपोर्टनुसार अलमट्टीतून अडीच ते 3 लाख क्यूसेकपेक्षा जास्त पाणी त्यांनी सोडलं नाही. त्यामुळे इथल्या फुगवट्यात जास्त सुधारणा झाली नाही. असेही पवार यांनी सांगीतले.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.