पुण्यातील आयटी कंपन्या सुरु करण्यास उद्योग विभागाची परवानगी

कोरोनामुळे अनेक आयटी कंपन्या या गेले 2 महिने बंद आहेत. तर या सर्व आयटी कंपन्यांचे काम घरून सुरु आहे. मात्र आता पुणे शहरातील कंटोन्मेंंट झोन वगळता इतर भागातील आयटी कंपन्या सुरु करण्यास उद्योग विभागाने परवानगी दिली आहे.

कोणत्या बड्या नेत्याच्या सांगण्यावरुन वाधवान यांना हे पत्र दिले? सत्य जनतेसमोर यायला हवं…

उद्योग विभागाने दिलेल्या परवानगी नुसार, काही अटी आणि शर्तीनुसार सोशल डिस्टन्सचे पालन करत कंपन्या सुरु करण्याची परवानगी आहे. पुणे शहरात साडे चारशे मोठे आणि 1400 लहान आयटी उद्योग आहेत. तर 72 आयटी पार्क असून या कंपन्यांमध्ये साडेचार लाख कर्मचारी काम करतात. त्यामुळे कार्यालयात काम करताना एकमेकांना स्पर्श होण्याचा धोका असल्याने आयटी कंपन्यांमध्ये सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे लागणार आहे.

Loading...

दरम्यान पुण्याच्या उपनगरांमध्ये आयटी इंडस्ट्रीचा मोठ्या प्रमाणत विकास झाला आहे. मगरपट्टा, नगर रस्ता, सोलापूर रस्ता, कोथरूड, चांदणी चौक, नांदेड सिटी, रामवाडी परिसर, डेक्कन, नळस्टॉप, पाषाण, बाणेरसह इतर विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणत आयटी कंपन्या आहेत.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.