नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात वकील मनोहर लाल शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे. दिल्लीचे नवे पोलीस आयुक्त म्हणून राकेश अस्थाना यांची केलेली नियुक्त नियमबाह्य असून, या नियुक्तीला आव्हान या याचिकेच्या माध्यमातून देण्यात आले आहे.

राकेश अस्थाना यांची दिल्लीच्या पोलीस आयुक्तपदी केलेली नियुक्ती ही नियमांचे उल्लंघन असल्याचे शर्मा यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे. शिवाय सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, अशा सर्व प्रकारच्या नियुक्त्या सर्वप्रथम लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून नोटिफाय करायला हव्यात.

सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे की, सर्व नियुक्त्या लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून व्हायला हव्यात. ज्यांचा कमीत कमी 6 महिन्याचा कालावधी राहिला आहे. त्यांची आयुक्तपदी नियु्क्ती केली जाऊ शकत नाही, असं देखील न्यायालयाने स्पष्ट केलं होतं. राकेश अस्थाना यांचा कार्यकाळ 6 महिन्यांपेक्षा कमी राहिला आहे. त्यामुळे त्यांची नियुक्ती करणं चुकीचं असल्याचं मनोहर लाल शर्मा यांनी याचिकेत म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा